Monday, April 23, 2012

Samriddhi Wealth Management Investment Fraud

इमुनंतर नाशिकमध्ये आता समृध्दी घोटाळा

Monday, 23 April 2012 16:52
 
समृद्धी घोटाळा
समृद्धी घोटाळा
नाशिक : इमुनंतर नाशिकमध्ये आता समृध्दी घोटाळा उघड झाला आहे.  वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली महिन्यांमध्ये पैसे दामदुप्पट करुन देण्याची खोटी आश्वासनं देणारी समृध्दी वेल्थ मॅनेजमेंट कंपनी(Samriddhi Wealth Management Investment Fraud) हजारावर (Nasik Investors) नाशिककरांना तब्बल ३०० कोटीचा चुना लावून गायब झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजरला अटकही केली आहे.  आधी पतसंस्था, नंतर इंडियन इमु कंपनी(India Emu Company), मग आयएमएस (IMS) आणि आता समृध्दी.नाशिकमधल्या गुंतवणुकदारांची आर्थिक समृध्दी हिरावून घेणारा अजून एक घोटाळा उघडकीस आलाय.
हा घोटाळाही थोडाथोडका नाही तर तब्बल ३०० कोटींचा(300 crores) आहे. हो ३०० कोटींचा. शेअरबाजार Sharemarket, कमोडिटी मार्केट Commodity Market, रिअल इस्टेटच्या Real Estate Business व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीवर ५ ते ८ टक्के व्याज 5 to 8% interest आणि १४ महिन्यांत दामदुप्पट(14 months double money) पैसे देण्याची हमी देणा-या समृध्दी वेल्थ मॅनेजमेंट कंपनीनं नाशिकमधून गाशा गुंडाळला आहे.

नाशिकमधल्या काही हजार गुंतवणुकदारांचे ३०० कोटी रुपये बुडवून या कंपनीचा संचालक अजय वासुदेव क्षत्रीय (ajay vasudev Kshatriya)आणि त्याची पत्नी मनिषा(Manisha) पळून गेली आहे. सोमवारी तरी पैसे मिळतील या अपेक्षेने गुंतवणुकदार मुंबई नाक्यावरच्या समृध्दीच्या कार्यालयाजवळ जमा झाले. मात्र त्यांचा हिरमोडच झाला. कारण कंपनीच्या कार्यालयाला सिल(seal to office) लागलं होतं आणि फलकासह हे कार्यालयच गायब झालं होतं.

विशेष म्हणजे १०० रुपयांच्या स्टँम्पपेपरवर अॅग्रीमेंट करुन प्रॉमिसरी नोट करुन घेत गुंतवणुकदारांकडून पैसे घ्यायचा. त्यामुळे क्षत्रीय फसवेल अशी शंका आली नाही असं गुंतवणुकदारांचं म्हणणंय. दरम्यान, समृध्दीच्या विरोधात आतापर्यंत १०३ गुंतवणुकदारांनी ५ कोटी ३३ लाखांची फसवणुक केल्याची तक्रार पोलीसांत केली आहे. एमपी़डीआयए अॅक्टनुसार गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी समृध्दीचा मॅनेजर नरेंद्र जोशीला (Manager Narendra Joshi)अटक केली आहे. समृध्दीचा संचालक अजय आणि त्याची पत्नी मनिषा क्षत्रीय मात्र फरार झाले आहेत.

दामदुप्पट पैसे करुन देण्याचा मोहात नाशिककरांनी दिवाळखोर होण्याची लुटले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. पण तरीही कमी श्रमात लवकर श्रीमंत होण्याचा मोह आवरता येत नसल्यामुळे घोटाळेबाजांची नाशिकमध्ये चलती आहे.

2 comments:

  1. Ajay Kshatriya had earlier cheated lots of people in data entry kind of jobs with the name of firm Multivision Enterprises at Zope complex , M .G. Road. That time he managed his fraud with the help of few friends in police and politics. Than he opened new firm called Samruddhi and looted People.
    I am also one of the victims but unfortunately police did not help me in this case.

    Regards,
    Prashant Jadhav

    ReplyDelete
  2. I am really impressed with your blog article, such great & useful knowledge you mentioned here.Your post is very informative. I have read all your posts and all are very informative. Thanks for sharing and keep it up like this.
    Finance your venture capital business in Nashik

    ReplyDelete

Search here anything you like