Wednesday, October 10, 2012

Dahanu Janata Bank 6 crores rupees fraud

डहाणू जनता बँकेच्या (dahanu janata bank) सहा कोटी रूपये घोटाळ्यातील चौघे संचालक गुजरातमध्ये पळून जात असताना मुंबई क्राइम बॅचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली . या सर्वांना शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली .

डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष डहाणू नगर पालिकेचे नगराध्यक्ष भरत राजपूत (bharat rajput)व त्यांचे नातलग तसेच काही संचालकांनी तसेच कर्मचा - यांनी अशा २३ जणांनी कोटी ९६ लाख रूपयांचा घोटाळा केला असून या प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

संचालक भरत राजपूत(Bharat Rajput) , वसंत कार्नावट(Vasant Karnavat) , भरत शहा(Bharat Shaha) , रमेश कर्नावट (Ramesh Karnavat) , शिवराम राऊतShivram Raut) , अजित कांकरीया(ajit Kankariya) , बानु इ्रराणी(Banu Irani) , मोहिनी फाटक(Mohini phatak) , अजय छाजेड(ajay chhajed) , प्रलहाद तांडेल(Pralhad Tandel) या सर्वांनी कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला . १० संचालकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावले मात्र तेथेही अपयश आल्याने शरणागंती पत्करण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे या सर्वांची अटक अटळ होती .

बँकेचे विद्यमान अध्यक्ष भरत राजपूत , संचालक वसंत कर्नावट , भरत शहा , रमेश कर्नावट हे चौघे मोटारीन मुंबई - अमहमदाबाद मार्गाने शुक्रवारी गुजरातकडे चालले होते . ही बाब मुंबई क्राइम बॅचच्या पथकाला सजमल्यावर महामार्गावर सापळा रचला त्यांना अटक केली . अटकेनंतर या सर्वांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले . बँकेचे कर्मचारी मधुकर वनमाळी , सतीश शेट्टी(satish shetty) , रमेष मलावकर(ramesh malavkar) , जगदीष राजपूत(jagdish rajput) तसेच सचिन पाटील(sachin Patil) या पाच जणांना या आधीच अटक करण्यांत आली आहे . अन्य तिघे अद्यापही फरार असल्याचे सांगण्यात आले .

No comments:

Post a Comment

Search here anything you like