Thursday, February 7, 2019

D T Marketing company founder, Sanjay Dusane Nashik Fraud Company




Mumbai: Man booked for duping investors of Rs 1.25 crore


In his complaint to the police, Lade has alleged that the company gave a free gift to investors who invested Rs 8,500 and offered further incentives to those who would get others to invest.


The police said that when the company representatives allegedly made excuses in response to Lade’s telephonic inquiries, he visited their Nashik office. (Representational photo)
THE FOUNDER of a Nashik-based marketing company was booked last week for allegedly defrauding investors of Rs 1.25 crore. The company’s alleged illegal activities came to light when a Bhayander resident, along with others, approached the police on Saturday.

Complainant Nilesh Lade (40) came to know about the company, D T Marketing, from a friend last month. In his complaint to the police, Lade has alleged that the company gave a free gift to investors who invested Rs 8,500 and offered further incentives to those who would get others to invest. “For every new investor introduced, the company promised to pay Rs 1,000. My friend told me that the money invested would be circulated among investors and there wasn’t much work to be done apart from finding new investors,” Lade claimed.

In mid-January, Lade met the company founder, Sanjay Dusane, to learn more about its schemes. Following Dusane’s presentation, Lade claimed he was impressed enough to open two accounts, and invested Rs 8,500 in each. However, he began to grow suspicious when the free gift promised by the company did not arrive even after two weeks.

The police said that when the company representatives allegedly made excuses in response to Lade’s telephonic inquiries, he visited their Nashik office. “There, I met several other investors, who claimed to have been cheated by the company. Dusane was nowhere to be found,” Lade alleged in his complaint. These investors allegedly claimed that the best performing investors had been promised fully-paid foreign vacations and cars by the company, prompting them to pump in more money.


Advertising
Not assured by promises made by the company representatives that their money would be refunded, a group of investors, including Lade, on Saturday filed a complaint at Navghar police station. “We have registered a case and are investigating the claims made by the investors,” said Inspector Vilas Sanap of the Economic Offences Wing, Thane Rural Police.

ठाणे ग्रामीणच्या नवघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

कंपनीत ८ हजार ५०० रुपये गुंतवल्यास एक भेटवस्तू देण्यात येईल. नंतर कंपनीला सदस्य मिळवून दिल्यास प्रत्येक सदस्यामागे एक हजार रुपये मिळतील. अशाप्रकारे चांगला फायदा होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या नाशिकच्या डी. टी. मार्केटिंग या कंपनीने गुंतणूकदारांना सुमारे १ कोटी २५ लाखांचा गंडा घातला असल्याची बाब समोर आली आहे. मार्केटींगच्या नावाखाली या कंपनीने मिरा-भाईंदरसह राज्यात आणि राज्याबाहेरील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे शंका व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या नवघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याची चौकशी देण्यात आली आहे.

भाईंदर पूर्व येथील निलेश लाडे (४०) यांची फसवणूक झालेली असून मित्राकडून त्यांना डी. टी. मार्केटींग कंपनीविषयी माहिती समजली होती. कमी गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला फायदा होईल. या कंपनीचे कामकाज साखळी पद्धतीने चालत असून कंपनीला सदस्य बनवून पैसे कमवायचे, असे मित्राने सांगितले. त्यामुळे लाडे यांनी कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. फोनद्वारे कंपनीत संपर्कही साधला होता. ५ जानेवारी रोजी कंपनीकडून संजय दुसाने हा व्यक्ती कंपनीच्या योजनेबत माहिती देण्यासाठी भाईंदरला आला. यावेळी त्याच्यासोबत ५ ते ६ जण होते. दुसाने याने कंपनीचे मुख्य कार्यालय नाशिकमध्ये आहे. राज्यात आणि राज्याबाहेरही कंपनी मार्केटिंगचे काम करत असून कंपनीत गुंतवणूक केल्यास आणि सदस्य बनवल्यास लाखो रुपयांचा फायदा होण्याचे आमिष दाखवले. कंपनीत ८ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक करून वस्तू विकत घ्यावी लागेल. नंतर तुम्ही कंपनीला सदस्य मिळवून दिल्यास प्रत्येक सदस्यामागे एक हजार रुपये मिळतील, असेही दुसाने यांनी आमिष दाखवले होते.

कंपनीच्या स्कीमवर लाडे यांचा विश्वास बसल्याने कंपनीत एकूण १७ हजारांची गुंतवणूक केली होती. मात्र त्यांच्यासह भाईंदरमधील इतरही गुंतवणूकदारांना भेटवस्तू मिळालीच नाही. याबाबत कंपनीत विचारणा करूनही कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती. लाडे यांनी मित्रासह कंपनीचे नाशिकमधील मुख्य कार्यालय गाठले. त्याठिकाणी इतरही बरेच रहिवासी गोळा झाले होते. डी. टी. मार्केटींग कंपनीने लाड यांच्यासह इतरही अनेक जणांना फसवले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लाडे यांनी त्यांच्यासह इतर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत दुसाने याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.


No comments:

Post a Comment

Search here anything you like