लॉकर्समध्ये काहीच नसल्याचे मी आधिपासूनच सांगत होते, असे विशाल फटे (Vishal phate Scam) म्हणाला.
सोलापूर : बार्शी येथील विशाल फटे (Vishal phate) याच्या भगवंत सहकारी पतसंस्थेतील दोन्ही लॉकर्स शनिवार
विशाल फटे याचे बार्शी शहरातील भगवंत पतसंस्थेत दोन लॉकर्स आहेत. शुक्रवारी चावी नसल्याने त्या उघडता आल्या नव्हत्या, त्यामुळे शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित लॉकर्सच्या साई सिक्युरिटी सर्व्हिसेस अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. चावी नसल्याने साई सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञांमार्फत प्रथमत: एक लॉकर्स उघडले, त्यात त्यांना काही आढळून आले नाही. पोलिसांनी दुसरे लॉकर उघडण्यास सांगितले तेही उघडण्यात आले, मात्र त्यातही काहीच मिळून आले नाही. दोन्ही लॉकर्समध्ये काही नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांचा भ्रमनिराश झाला. दोन्हींमध्ये काहीच नसल्याने पोलिसांनी विचारणा केली तेव्हा विशाल फटे याने मी अगोेदरच सांगितले होते, लॉकरमध्ये काहीच नाही, असे तो म्हणाला.
दुपारी १२ वाजता या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली होती. पतसंस्थेतील लॉकर्स उघडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संजयकुमार बोठे व त्यांचे पथक गेले होते. लॉकर्स उघडताना सरकारी पंच, साई सिक्युरिटी सर्व्हिसेचचे अधिकारी व तंत्रज्ञ आणि भगवंत पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. लॉकर्समध्ये काहीच न मिळाल्याने सर्वजण माघारी परतले. दरम्यान, शनिवारी एका तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखेकडे एक तक्रार दिली आहे. २८ लाखांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अकराव्या महिन्यातच केला असावा कार्यक्रम
विशाल फटे याला पुढचा धोका लक्षात आला होता. आपल्या विरुद्ध तक्रारी दिल्या जाऊ शकतात, त्यानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने नोव्हेंबर २०२१ मध्येच लॉकर्समध्ये ठेवलेली रक्कम किंवा अन्य ऐवज तेथून काढून घेतली असावी, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
विशाल फटे हा पूर्वी लॉकर्समध्ये काही नाही, असे म्हणत होता, मात्र त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. तपासाचा भाग म्हणून आम्ही दोन्ही लॉकर्स तपासले. लॉकरमध्ये काही मिळून आले नाही, आता पुढील तपास सुरू आहे.
संजयकुमार बोठे, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर.
No comments:
Post a Comment