More than 50 Ponzi schemes on Police Radar
५० हून अधिक पॉन्झी योजना पोलिसांच्या रडारवर!
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची जबाबदारी आतापर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडे होती
आर्थिक गुन्हे विभाग स्वत:हून कारवाई करणार ; गुंतवणूकदारांमध्ये जागरूकतेसाठी समाजमाध्यमांचा वापर
आर्थिक फसवणुकीच्या तब्बल ५० हून अधिक पॉन्झी योजना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या रडारवर आहेत. अशा प्रत्येक प्रकरणात ‘सिक्युरिटी एक्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’कडून तक्रार येण्याची वाट न पाहता स्वत:हून कारवाई करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांचे दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून अशा प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याआधीच त्याला आळा बसावा, असा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची जबाबदारी आतापर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडे होती. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर या विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्तपद निर्माण करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्तपद धडाडीने सांभाळणारे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. बँकेतील प्रशासनाचा अनुभव असलेल्या कमलाकर यांनी सुरुवातीला आर्थिक गुन्हे विभागाची विस्कटलेली घडी नीट बसविण्यास सुरुवात केली. त्यानंतर दामदुप्पट योजनांकडे आपला मोर्चा वळविला. अशा योजनांना आळा घालण्यासाठी गुंतवणूकदारांमध्येच जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्याच वेळी कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी उद्भवणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांचा अभ्यास करून त्यातील फसव्या योजनांबाबत कारवाई सुरू करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक सुरू केले. या पथकाने अशा प्रकरणांचा अभ्यास सुरू केला आहे. आतापर्यंत एकाच प्रकरणात स्वत:हून पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला असला तरी भविष्यात या संख्येमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास या प्रकरणांशी संबंधित एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.
सेबीने अशा कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असली तरी प्रत्यक्षात फौजदारी कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अशा योजनांना आळा बसणे अशक्य असल्याचे आढळून आल्यामुळे कमलाकर यांनी अशा योजनांच्या प्रवर्तकांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस अशा योजनांना भुलणारे गुंतवणूकदार अनेक आहेत. गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
लोकांनीच अशा दामदुप्पट योजनांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहनही कमलाकर यांनी केले आहे. कमी वेळात अधिक नफा देणाऱ्या कुठल्याही कंपन्या असोत. कालांतराने त्यात फसवणूक ठरलेलीच आहे. तरीही हजारोंच्या संख्येने गुंतवणूकदार अशा योजनांना बळी पडत आहे. त्यामुळे या योजनांच्या प्रवर्तकांनाच चाप कसा आणता येईल, या दिशेने आर्थिक गुन्हे विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
आर्थिक फसवणुकीला आणखी कुणी बळी पडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर जागरूकता मोहीम आखण्यात आली आहे. फेसबुक आणि ट्विटरचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. अशा गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे. मोठा घोटाळा होण्याआधीच प्रवर्तकांना चाप लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
धनंजय कमलाकर, सहआयुक्त, आर्थिक गुन्हे विभाग.

No comments:
Post a Comment